Published on Oct 08, 2021
Maharashtra Day Speech in Marathi : Maharashtra Day, commonly known as Maharashtra Din is a state holiday in the Indian state of Maharashtra, commemorating the formation of the state of Maharashtra from the division of the Bombay State on 1 May 1960.
Maharashtra Day is commonly associated with parades and political speeches and ceremonies, in addition to various other public and private events celebrating the history and traditions of Maharashtra. It is celebrated to commemorate the creation of a Marathi speaking state of Maharashtra.
आज १ मे महाराष्ट्र दिन ज्याप्रमाणे आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र मिळाले त्याप्रमाणे महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा हा १ मे १९६० रोजी प्राप्त झाला. आणि तेव्हापासून या दिवसाला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि योगायोग म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच कामगार दिन (Labour Day) सुध्दा असतो आणि तो सुध्दा ह्याच दिवशी साजरा करण्यात येतो.
फक्त आपल्या देशात नाही तर संपूर्ण जगात आणि या दिवशी जवळ जवळ सर्वांना सुट्टीच असते, महाराष्ट्रामध्ये हा दिवस गणतंत्र दिवस किवां स्वतंत्रता दिवसा सारखा झेंडा फडकावून साजरा केला जातो त्या वेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत असतात. त्या मध्ये महाराष्ट्रावर भाषण, निबंध, कविता या सारख्या प्रतियोगिता होत असतात. त्यासाठी आज आपण महाराष्ट्र दिनावर छोटास भाषण पाहणार आहोत, तर चला पाहूया…
व्यासपीठावर उपस्थित असलेली पाहुणे मंडळी आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो आज आपण येथे सर्व महाराष्ट्र दिनानिमित्त एकत्र जमलेले आहोत, आणि आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी काही दोन शब्द आपल्या समोर मांडणार आहे, आपल्याला विनंती आहे की आपण त्या शब्दांना लक्षपूर्वक ऐकावे.
मित्रहो आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकर यांच्या विचारांनी निर्माण झालेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात अनेक थोर महापुरुष होऊन गेलेलं आहेत, एवढेच नव्हे तर महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते.
संत तुकाराम, ज्ञानेश्वर, आणि एकनाथ यांच्या सारख्या कित्येक महान संतांचे चरण आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत. आणि या महाराष्ट्राच्या मातीतून कित्येक थोर महात्मे जन्माला आलेले आहेत. अश्या या महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा १ मे १९६० रोजी देण्यात आला. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्राची जी लगाम आहे ती त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपविली.
तसे पाहिले तर आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आणि ऐतिहासिक वारसा हा खूप मोठा आहे सोबतच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामागे आपल्या या महाराष्ट्राच्या कित्येक क्रांतिकरांचा हात आहे, मग ते वासुदेव बळवंत फडके असोत की लोकमान्य टिळक असोत.
म्हणूनच महात्मा गांधीजींनी या महाराष्ट्र देशाला मोहळाची उपमा दिली होती. महाराष्ट्रात जन्माला येणं म्हणजे पूर्व जन्मीच पुण्य सार्थक झाल्या सारखे आहे, प्रत्येकाला गर्व असावा असा आपला महाराष्ट्र.
याच महाराष्ट्राने कित्येक, कवी, कलाकार, संगीतकार, खेळाडू यांना जन्म दिलाय, ते कवी पु.ल.देशपांडे असोत की कवियत्री बहिणाबाई आजही ते साहित्याच्या रुपात आपल्या महाराष्ट्रात जिवंत आहेत.
हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राने मुघलांचे राज्य स्वीकारले नाही आणि त्या काळात स्वराज्याचे स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवले, आणि फक्त डोळ्यासमोरच ठेवले नाही तर आपले प्राण पणाला लावून रयतेसाठी स्वराज्याची स्थापना सुध्दा केली, आणि सर्वदूर सुराज्य निर्माण केले, माझ्या राजांबरोबर असणाऱ्या मावळ्यांचा या स्वराज्यात आणि महाराष्ट्राच्या निर्माणात खारीचा वाटा आहे. आणि त्या सर्वांना विसरता काम नये.
अनेक महान लेखकांनी या महाराष्ट्राविषयी विशेष शब्द लिहिलेले आहेत राम गडकरी यांनी आपल्या महाराष्ट्राला मंगल देशा, पवित्र देशा, अश्या शब्दात याचे वर्णन केले आहे तर संत ज्ञानेश्वरांनी,
• मुठभर मावळ्याना घेऊन
हजारो सैतानांना नडून गेला !
स्वर्गात गेल्यावर
देवांनी ज्याला झुकून
मुजरा केला असा एक
" मर्द मराठी शिवबा " होऊन गेला .!!
॥ जय शिवराय ॥ जय जिजाऊ ॥
महाराष्ट्राच्या तमाम मराठी जनतेला महाराष्ट्र
दिनाच्या हर्दिक शुभेच्छा .!!!
• महाराष्ट्र दिनाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना पाठवा हे महाराष्ट्र दिवस शुभेच्छा
• भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा... जय जय महाराष्ट्र देशा
• बहु असोत सुंदर संपन्न की महा...प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
• शिव निष्ठा येथ असे सतत जागती...अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
• भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
• पैठणचे प्रेम अमित देश कोकणा... पंढरीस ये विदर्भ देवदर्शना... अजरामर ऐक्यभाव येथ दृढमती.... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
• बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय, रयतेचा छत्रपती आमचा शिवराय…महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
• छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र... माझ्या राजाचा महाराष्ट्र...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
• जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी... गुणगुणलो जे गीत गीत मराठी.... मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
• लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
• महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र
• आजच्या शुभ दिवशी तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी महाराष्ट्र दिन
• माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा,
गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा…
गर्जा महाराष्ट्र माझा…
• आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असण्याचा..
आम्हाला गर्व आहे
मराठी भाषेचा..
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
• दगड झालो तर ‘सह्याद्रीचा’ होईन!
माती झालो तर ‘महाराष्ट्राची’ होईन!
तलवार झालो तर ‘भवानी मातेची’ होईन!
आणि…
पुन्हा मानव जन्म मिळाला तर ‘मराठीच’ होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!